Jump to content

सौरभ गांगुली

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

सौरभ चंडीदास गांगुली (बांगला:সৌরভ গাঙ্গুলী) (जुलै ८, इ.स. १९७२ - )[] भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

गांगुली डावखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे.[] त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत.[] गांगुली भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे[] याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत.[] गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,०००धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.[]

गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला.[] याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता.[]

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:क्रम

साचा:१०००० धावा एकदिवसीय सामने साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:सहारा पुणे वॉरियर्स सद्य संघ