Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385 कामारेड्डी जिल्हा - मराठीपिडिया
कामारेड्डी' हा भारताच्या तेलंगणाराज्यातील राज्यातील जिल्हा आहे. कामारेड्डी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[१] जिल्हा निजामाबादच्या जिल्ह्यापासून विभागला गेला आहे आणि ११-१०-२०१६ पासून कामारेड्डी जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला आहे. इ.स. १६०० ते १६४० या काळात या भागावर राज्य करणाऱ्या डोमाकोंडा किल्ल्याचा शासक चिन्ना कामारेड्डी यांच्यावरून जिल्ह्याचे नाव कामारेड्डी पडले.
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या कामारेड्डी जिल्ह्याची लोकसंख्या ९,७२,६२५ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०३३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ५६.५१% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १२.७१% लोक शहरी भागात राहतात.
२०११ च्या जनगणनेच्या वेळी, ७७.०७% लोकसंख्या तेलुगू, ८.७३% उर्दू, ७.५७% लंबाडी, ३.८९% मराठी आणि ३.२३% कन्नड ही त्यांची प्रथम भाषा बोलत होती.