शिवाजी मंदिर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:३३, २८ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

श्री शिवाजी मंदिर हे दादर, मुंबई येथील प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ या न्यासाकडे आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाले. दादर(पश्चिम)मधील प्लाझा या चित्रपटगृहाच्या हे बरोब्बर समोर आहे. हे एक बंदिस्त सभागृह असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहातील रंगमंचाचा आकार ३० X ४० फूट आहे. रंगमंचासमोरचा व्हेलव्हेटचा मोठा दर्शनी पडदा ३० X १२ फुटाचा आहे. नाट्यगृहाच्या आसनक्षमतेनुसार या प्रेक्षागृहात १०३२ प्रेक्षक बसू शकतात. शिल्पे आणि चित्रे मांडायची सोय असलेले एक कलादालन नाट्यगृहाला जोडूनच आहे.

शिवाजी मंदिरच्या आवारात नाटकांत काम करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांच्या राहण्याची सोय नाही. साचा:मुंबई