सादतखान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सादतखान हा अयोध्येच्या वारसाराज्याची स्थापना करणारा मुघल सरदार होता. महंमद अमिन असे त्याचे नाव असून सादतखान हा त्याचा किताब होता. तो मूळचा पर्शियाचा होता. त्याने इ.स. १७२२ पासून इ.स. १७३९ पर्यंत अयोध्येचा नवाब म्हणून कारभार केला.