अलीराजपूर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अलीराजपूर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील छोटे शहर आहे.

अलीराजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २८,४९८ होती. यांत ५२% पुरुष तर ४८% स्त्रीया होत्या.

येथे आंब्यांचा मोठा बाजार असून आसपासच्या प्रदेशातील आंब्यांची खरेदीविक्री येथे होते.

हे शहर अलीराजपूर संस्थानाची राजधानी होते. हे संस्थान ब्रिटिश भारतातील भोपावाड एजन्सीतील राज्य होते.