राहुल देशपांडे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट गायक राहुल देशपांडे (१० ऑक्टोबर, इ.स. १९७९; पुणे, महाराष्ट्र - हयात) लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. त्यांनी सुरू केलेला वसंतोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. हिंदुस्तानी संगीतातील गायक वसंतराव देशपांडे त्यांचे आजोबा होते. त्यांनी हिंदुस्तानी शैलीतील गायनाचे प्रशिक्षण उषा चिपलकट्टी, मुकुल शिवपुत्र, गंगाधरबुवा पिंपळखरे, मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे घेतले.

राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीवरील सूर-ताल आणि नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत.

देशपांडे यांनी संगीत मानापमान या संगीतनाटकाचे पुनरुज्जीवन केले.

पुरस्कार संपादन

साचा:कॉमन्स वर्ग साचा:संगीतातील अपूर्ण लेख साचा:हिंदुस्तानी संगीत