रघुनंदन पणशीकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट गायकसाचा:विस्तार पंडित रघुनंदन पणशीकर (जन्म १९६३) हे जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत. जयपूर-अत्रौली घराण्याची प्रख्यात अनन्यसाधारण शैली प्रतिबिंबित करणारी त्यांची गायन शैली - पूर्ण भरलेला आकार, तान, लयकारी  आणि अतिशय सुरेखपणे घेतलेली मींड आणि गमक भारतीय शास्त्रीय गायनात त्यांचे एक अविभाज्य स्थान निर्माण करते. एक अष्टपैलू कलाकार असल्याचे सर्व गुण त्यांच्या गायनात अगदी सहजपणे दिसून येतात, ख्याल गायकी असो अथवा भजन, ठुमरी असो वा गझल किंवा नाटय संगीत ते अगदी सहजपणे गातात. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्तकर्ते, पंडित रघुनंदन पणशीकर यांनी  भारतातील शहरांव्यतिरिक्त युरोप, अमेरिका आणि आखाती देशांतील श्रोत्यांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध केलेले आहे. 

पुरस्कार संपादन

  • बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार (१५-७-२०१७)

साचा:हिंदुस्तानी संगीत साचा:संगीतातील अपूर्ण लेख