सुब्रमण्यम स्वामी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०५, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट संसद सदस्य

डॉ. सुब्रमण्यन स्वामी अथवा सुब्रमण्यम स्वामी (१५ सप्टेंबर, इ.स. १९३९,चेन्नई[] - हयात) एक भारतीय नेता, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व एक अर्थशास्त्रज्ञ आहेत.[] सध्या ते जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.[]

राजकीय कारकीर्द संपादन

सुब्रमण्यम स्वामी ५ वेळा भारतीय लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९० -९१ या काळात केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री - व्यापार, कायदा व न्याय मंत्री होते.[]

शैक्षणिक कार्य संपादन

हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेटची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सायमन कुझनेट्सपॉल सॅमुएल्सन यांच्या सोबत संशोधन कार्य केले व यांच्या सोबत संयुक्त लेखक रूपात "इंडेक्स नंबर थेअरी" या विषयावर एक नवीन व पथ प्रदर्शक अध्ययन प्रस्तुत केले. ते हार्वर्ड विद्यापीठात सन्माननीय पाहुणे अध्यापक म्हणून जात असत[]. २०११ मध्ये त्यांनी इस्लामविषयी लिहिलेल्या लेखामुळे त्यांचे अध्यापन बंद करण्यात आले. []

सामाजिक लढा व कार्य संपादन

त्यांनी कायम आपल्या तत्त्वांसाठी निर्भयपणे संघर्ष केला आहे. आणीबाणी दरम्यान ऐतिहासिक साहसी संघर्ष, तिबेट मधील कैलाश-मानसरोवर यात्री मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न, भारत - चीन संबंधांत सुधारणा, भारत - इस्रायल संबंधांत सुधारणा, आर्थिक सुधारणा व हिंदू पुनरुत्थान, इत्यादी काही बाबी त्यांच्या ठळक कार्यांपैकी आहेत.

२ जी तरंग भ्रष्टाचार उघड करून दोषींवर कारवाई करवण्यात त्यांच्या न्यायालयीन लढाईचा मोठा हात आहे. []

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:अनुवाद