Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मन्सूर अली खान पटौदी - मराठीपिडिया

मन्सूर अली खान पटौदी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox Historic Cricketer मन्सूर अली खान पटौदी (उर्दू: منصور علی خان ; रोमन लिपी: Mansoor Ali Khan ;), लघुनाम एम.ए.के. पटौदी (रोमन लिपी: M.A.K. Pataudi), टोपणनाव टायगर (५ जानेवारी, इ.स. १९४१; भोपाळ, ब्रिटिश भारत - २२ सप्टेंबर, इ.स. २०११; नवी दिल्ली, भारत) हा भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेटखेळाडू व माजी कर्णधार होता. भारतीय राज्यघटनेतील २६व्या घटनादुरुस्तीनुसार[] इ.स. १९७१ साली भारतातील संस्थानिकांचे सर्व वतनाधिकार रद्द होईपर्यंत हा पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब होता.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
{{लेखनाव}] याच्या क्रिकेट कारकीर्दीतील कामगिरीचा आलेख.

मन्सूर अली खानाने इ.स. १९६१ ते इ.स. १९७५ या काळात भारतीय क्रिकेट संघाकडून ४६ कसोटी सामने खेळले. तो प्रामुख्याने उजवखोरा फलंदाज म्हणून खेळत असे, तसेच उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही करत असे. इ.स. १९६२ ते इ.स. १९७० या काळात त्याने ४० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले व त्यांपैकी ९ सामने भारताला जिंकता आले.

फुप्फुसांच्या संसर्गामुळे नव्या दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलात दाखल होऊन उपचार चालू असताना २२ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याचा मृत्यू झाला[]. भारतीय चित्रपट-अभिनेत्री शर्मिला टागोर त्याची पत्नी असून हिंदी चित्रपट-अभिनेता सैफ अली खान व हिंदी चित्रपट-अभिनेत्री सोहा अली खान त्याची मुले आहेत.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन


साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:क्रम साचा:क्रम