शांताराम शिवराम सावरकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शांताराम शिवराम सावरकर ऊर्फ बाळाराव सावरकर (? - नोव्हेंबर २०, इ.स. १९९७) हे मराठी राजकारणी, अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते.

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांच्या ’मला काय त्याचे’ (१९७३) या कादंबरीची प्रस्तावना बाळाराव सावरकर यांनी लिहिली आहे. ते ’वीर सावरकर आणि गांधीजी’ या लेखसंग्रहाचे संकलक होते.

गांधीहत्येनंतर दिल्लीत तुरुंगात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा निषेध करण्यासाठी मुंबईतील सावरकर-सदनावर संतप्त जमाव चालून आला होता तेव्हा बाळाराव सावरकर, भास्कर शिंदे आणि तेंडुलकर यांनी केवळ लाठीच्या साहाय्याने जमावाला तोंड दिले. मात्र या हल्ल्यात स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधु डॉ. नारायणराव हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच पुढे १९ ऑक्टोबर, १९४९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

बाळाराव सावरकरांनी लिहिलेली पुस्तके संपादन