माती गणपती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

माती गणपती हा पुण्यातील मोठी मूर्ती असलेला एक गणपती आहे. नारायण पेठेत असलेल्या या गणपतीची मूर्ती संपूर्ण मातीची आहे असे सांगितले जाते. मातीच्या मूर्तींपैकी ही सर्वात जुनी, म्हणजे इसवी सनाच्या अठराव्या शतकातील मूर्ती आहे.साचा:संदर्भ हवा मूर्तीचा आणि मंदिराचा इतिहास ज्ञात नाही.

माती गणपतीची ही मूर्ती चार ते साडेचार फूट उंच असून दोन ते अडीच फूट रुंद आहे. तिच्या चार हातांपैकी डावा खालच्या बाजूचा हात, दुमडलेल्या डाव्या पायावर ठेवलेला असून त्याच हातावर सोंड टेकलेली आहे. गणपती उजव्या हाताने अभय देतो आहे. वरच्या हातांमध्ये शस्त्रे नाहीत.

देवळाच्या गाभाऱ्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपात शिवलिंग व विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती आहेत.

इ.स. १९९८मध्ये देवळाचा जीर्णोद्धार झाला. पानशेतच्या पुरात संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले असताही गणपतीच्या या मातीच्या मूर्तीला काहीही झाले नाही; तसेच देवापुढील शंख आणि घंटाही हलली नाही.साचा:संदर्भ हवा

या माती गणपतीच्या देवळाची मालकी श्रोत्री कुटुंबाकडे आहे.साचा:संदर्भ हवा