गणपती स्तोत्रे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिस्रोतातस्थानांतरित

गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डंच एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमंच षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रंच दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर: नच विघ्नभयं तस्य सर्वसिद्धीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धींच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||


जयजयाजी गणपती (गणपतीस्तोत्र) जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती । करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।

तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती । विष्णू शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥

तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक । सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥

मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात । देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥

माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे । संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती । मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥

तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय । तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती ॥

गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥

भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना । परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥

विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा । पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥

नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता । नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥

नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची । सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥

मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण । लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥

मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक । भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥

मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी । अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥

हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन । विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥

त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात । स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥

होईल सिद्धी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता । गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥

इति श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्। श्री गजाननार्पणमस्तु।