Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
केलुचरण मोहपात्रा - मराठीपिडिया

केलुचरण मोहपात्रा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

केलुचरण मोहपात्रा (जन्म : ८ जानेवारी १९२६; - ७ एप्रिल २००४ ) हे अभिजात भारतीय ओडिसी नर्तक आणि गुरू होते. [] त्यांनी विसाव्या शतकात ओडिसी नृत्य कलेचे पुनरुज्जीवन केले.[] पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे ते ओरिसातील पहिली व्यक्ती आहेत.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नृत्यग्राम संस्थेतील शिल्प

प्रारंभीचे आयुष्य संपादन

भगवान जगन्नाथाला प्रसन्न करण्यासाठी सादर केला जाणारा गोतीपुआ हा ओरिसातील पारंपरिक नृत्यप्रकार गुरू केलुचरण मोहपात्रा यांनी तरुणपणीच सादर केला. यात स्त्रियांची वेशभूषा करून पुरुष नृत्य करीत असत.

कलेचे पुनरुज्जीवन संपादन

नंतरच्या आयुष्यात त्यांनी गोतीपुआ व माहारी या नृत्य प्रकारांत संशोधन केले, व त्यांतून त्यांनी एकूणच ओडिसी नृत्याची पुनर्बांधणी केली.[]गुरू केलुचरण मोहपात्रा हे तालवाद्यवादनात कुशल होते. मृदंग, पखवाज व तबला ह्यांतील त्यांचे कौशल्य त्यांनी केलेल्या नृत्यरचनांतून दिसून येते. पारंपरिक पट्टचित्रकला प्रकारातही ते प्रवीण होते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ओडिसी नृत्याचे सादरीकरण

नृत्यसंस्था संपादन

गुरू केलुचरण मोहपात्रा, त्यांच्या पत्नी लक्ष्मीप्रिया व मुलगा रतिकांत ह्यांनी सन १९९३मध्ये सृजन ही नृत्यसंस्था स्थापन केली.

सन्मान व पुरस्कार संपादन

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार - इ.स.१९६६
  • पद्मश्री- इ.स.१९७४
  • पद्म भूषण -इ.स. १९८८
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप- इ.स.१९९१
  • पद्म विभूषण- इ.स. २०००
  • मध्य प्रदेश शासनाकडून कालिदास सन्मान

संदर्भ संपादन