पोपटराव पवार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:काम चालू साचा:माहितीचौकट व्यक्ती पोपटराव बागूजी पवार हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत.

१९७२ मध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच दुष्काळात हिवरे बाजार गावाला देखील याचा फटका बसला. शेती आणि पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हिरवे बाजारचे हाल होऊ लागले. उत्पन्नाचे साधनच उरले नाहीत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आणि लोकांमध्ये दारूचे व्यसन जडले. गावात अनास्था माजली. ही अवस्था तब्बल १५ वर्षे होती. १९८९ साली ‘पोपटराव पवार’ हे गावाचे सरपंच झाले. पोपटराव पवार हे गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण झालेले नागरिक होते. त्यांनी गावात लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे गावाचं रुप पालटू लागलं. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंधारणाचे नियोजन त्यांनी केले.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

संदर्भसूची संपादन