अश्विनी तळेगावकर
अश्विनी केदार तळेगावकर या एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका आहेत. त्यांनी संगीतात एम.ए. केले असून त्या गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद आहेत. या रावेत (पिंपरी-चिंचवड) येथे राहतात.
सन्मान आणि पुरस्कार संपादन
- भारत सरकारची २००५ साली मिळालेली शिष्यवृत्ती
- आर्य संगीत प्रसार मंडळाची सवाई गंधर्व शिष्यवृत्ती (इ.स. २००७-२०१०)
- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पंडित पद्माकर कुलकर्णी स्मृती गौरव पुरस्कार (२०१६)