इंडियन एअरलाइन्स
इंडियन एअरलाइन्स भारतातील अंतर्देशीय आणि आसपासच्या देशांत विमानवाहतूक करणारी कंपनी होती. ही कंपनी डिसेंबर २००५पासून इंडियन या नावाने ओळखली जात असे. ही एअर इंडियाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी होती.[१] २६ फेब्रुवारी, २०११ रोजी ही कंपनी एअर इंडियामध्ये विलीन झाली.[२]