जवाहरलाल नेहरू मैदान, दिल्ली

साचा:माहितीचौकट स्टेडियम जवाहरलाल नेहरू स्टेडियम (साचा:Lang-en) हे भारत देशाच्या दिल्ली शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ६०,००० आसनक्षमता असलेल्या ह्या स्टेडियमला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांचे नाव देण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथे खेळतो.

नेहरू स्टेडियम १९८२ साली आशियाई स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी ह्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. आजवर येथे दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत. खेळांव्यतिरिक्त संगीत इत्यादी कार्यक्रमांसाठी देखील नेहरू स्टेडियम वापरले जाते.

बाह्य दुवे संपादन

साचा:Commons category साचा:भारतातील क्रिकेट मैदाने