जांभोरा
साचा:संदर्भहीन लेख जांभोरा हे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील एक गाव आहे. येथे दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर गोधनाची पूजा केली जाते. त्याला गोधनपूजन असे म्हणतात. ही विदर्भात सर्वसामान्य प्रथा आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे, या दिवशी गुराखी हे स्वतःला गायीच्या पायाखाली देतात. ही परंपरा येथे सुमारे १५० वर्षांपासून येथे सुरू आहे.साचा:संदर्भ हवा
येथे गाई म्हशींना सजवून त्यांची प्रथम मिरवणूक काढली जाते.येथील गुराखी हनुमान व माता मंदिरासमोर झोपतात व शेकडो गाई त्यांच्या आंगावरून जातात.तरीही त्यांना कोणतीही इजा होत नाही.साचा:संदर्भ हवा