दाग (१९५२ चित्रपट)
साचा:गल्लत दाग हा १९५२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात दिलीप कुमार, निम्मी व उषाकिरण ह्यांच्या प्रमुख भूमिका असून ह्या चित्रपटाचे संगीत शंकर जयकिशन ह्यांनी दिले आहे. १९५३ साली झालेल्या पहिल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये दिलीप कुमारला ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.