साचा:उदयोन्मुख लेख टीप साचा:माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्य दुराणी साम्राज्य (पश्तो: د درانیانو واکمني ;) हे इ.स. १७४७ ते इ.स. १८४२ या कालखंडात अफगाणिस्तानात अस्तित्वात होते. इ.स. १७४७ साली अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली याने कंदाहारात त्याची स्थापना केली. इ.स. १७७३ साली अहमदशाहाचा मॄत्यूनंतर त्याच्या वंशजांकडे साम्राज्याचे अमीरपद चालू राहिले.

परमोत्कर्षाच्या काळात दुराणी साम्राज्य पंजाबापासून इराणापर्यंतमध्य आशियातील अमू दर्या नदीखोऱ्यापासून अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. इ.स.च्या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भरभराटीत असलेल्याओस्मानी साम्राज्याखालोखाल विस्तार पसरलेले हे दुसरे इस्लामी साम्राज्य होते.[].

राज्यकर्ते संपादन

दुराणी साम्राज्याचे राजे अमीर या किताबाने उल्लेखले जात. साम्राज्याचा संस्थापक अहमदशाह अब्दाली याच्यानंतर त्याचे वंशज गादीवर बसले. कालक्रमानुसार त्यांची सूची अशी:

नाव कार्यकाळ
अहमदशाह अब्दाली इ.स. १७४७ - इ.स. १७७२
तिमूरशाह दुराणी इ.स. १७७२ - इ.स. १७९३
झमनशाह दुराणी इ.स. १७९३ - इ.स. १८०१
महमूदशाह दुराणी इ.स. १८०१ - इ.स. १८०३ (पहिल्यांदा)
इ.स. १८०९ - इ.स. १८१८ (दुसऱ्यांदा)
शुजाशाह दुराणी इ.स. १८०३ - इ.स. १८०९
अलीशाह दुराणी इ.स. १८१८ - इ.स. १८१९
अयूबशाह दुराणी इ.स. १८१९ - इ.स. १८२३

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग