धाराऊ पाटील (जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे १७ वे शतक) ही मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या लहानपणी त्यांचे संगोपन करणारी आई होती साचा:संदर्भ हवा. पुण्याजवळील भोर मावळातल्या कापूरहोळ गावातील एका धनगर गाडे-पाटील कुटुंबातील ती स्त्री होती. मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीराजांपाठोपाठ गुप्तवेषात मराठ्यांच्या राज्याकडे परतून येणाऱ्या संभाजीराजांचे तिने संगोपन केले असे मानले जाते.