पातोळ्या
पातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे.[१] [२]पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात.[३] कोकणात गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे.[२][४][५]
साहित्य आणि कृती संपादन
हळदीची पाने
तांदूळ पीठ
खोवलेला नारळ
वेलची पूड
कृती-
- पाणी उकळत ठेवून त्यात मीठ व तेल घालावे.
- पाण्याला उकळी आल्यावे त्यात पाण्याच्या सम प्रमाणात तांदूळ पिठी घालावी आणि झाकण ठेवावे.
- वाफ आल्यावर धग बंद करावी.
- उकड कोमट असताना मळून घ्यावी.
- नारळाचा चव आणि गूळ, वेलची पूड कढईत घ्यावे आणि मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावे.
- हे मिश्रण फार घट्ट करू नये, सैलसर ठेवावे.
- हळदीच्या पानाला तेल अथवा तूप लावून त्यावर उकडीचा गोळा थापून पसरवून घ्यावा.
- त्यावर तयार सारण पसरवून घ्यावे आणि हळदीचे पान एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे दुमडून घ्यावे.
- नंतर ही पाने वाफवून घ्यावीत आणि गरम पातोळे तुपासह खायला द्यावे. [१]