पारसिकाचा डोंगर हा ठाणे जिल्ह्यातील डोंगर आहे. साळशेत बेटाच्या पूर्वेस भारताच्या मुख्य भूमीवर असलेल्या या डोंगराची उंची १९८५मध्ये २३५ मीटर होती.[][] या डोंगराचा माथा म्हणजे ७ किमी उत्तर-दक्षिण धावणारी डोंगरकपार आहे. १९८५नंतर सुरू झालेल्या दगडखाणींमुळे या टेकडीचा आकार आणि उंची बदलले गेले आहेत. या डोंगरावरील १५ किमी परिसरात अभयारण्य आहे. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.[][]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

या डोंगराचा काही भाग नवी मुंबईमध्ये मोडतो. याच्या शिखराजवळ नवी मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान आहे.[]

बोगदा संपादन

या डोंगरातून पारसिकाचा बोगदा गेला आहे. हा बोगदा भारत आणि आशियातील सगळ्यात जुन्या बोगद्यांपैकी एक आहे. १९१६मध्ये खणलेल्या या बोगद्यातून मध्य रेल्वेची वाहतूक होते. त्याआधी बांधलेला रेल्वेमार्ग डोंगराला वळसा घालून मुंब्रा-कळवामार्गे मुंबईला ठाण्याशी जोडतो.

दगडखाणी आणि अनधिकृत वसाहती संपादन

विसाव्या शतकाच्या शेवटी हा डोंगर फोडून तेथील दगडमाती मुंबई महानगरातील बांधकामासाठी वापरली गेली. डोंगराचा सुमारे ९% भाग यात नष्ट झाला आहे. याच गतीने पुढील काही वर्षांत ३०% डोंगर नाहीसा होण्याचा अंदाज आहे.[][] शीळफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हजारो (२०१२ च्या अंदाजानुसार ११,०००) अनधिकृत झोपड्या वर घरे बांधली गेली आहेत. याशिवाय डोंगरावर सुमारे १०० अनधिकृत देवळे, मशीदी व इतर धार्मिक स्थळे बांधली गेली आहेत.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी