बाळासाहेब विखे पाटील
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी 30 डिसेंबर 2016 रोजी लोणी अहमदनगर येथे निधन झाले.
साचा:माहितीचौकट संसद सदस्य
जीवन संपादन
10 एप्रिल 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना सुरू केला होता.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्यासाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झाले.
ते मूळचे काँग्रेस पक्षाचे परंतु ते काही काळ शिवसेनेत होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे-पाटील यांनी देशभरातील 45 खासदारांना एकत्र करून काँग्रेस फोरम फॉर ॲक्शन स्थापन करून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले होते.
त्यातूनच पुढे 1991च्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी नगर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून निवडणूक लढवली. नगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व खजिनदार
राज्य साखर संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र पाणी परिषदेचे संस्थापक, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष इत्यादी महत्त्वाची पदे भूषविली.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस 16 ऑगस्ट शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शेतकरी दिन तिथीनुसार म्हणजेच डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांचा जन्म नारळी पौर्णिमेच्या असल्याने दरवर्षी हा दिवस नारळी पौर्णिमेला साजरा केला जाईल.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस एक जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
मंत्रीपद संपादन
अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पद 1999 ते 2001
अवजड मंत्रालयात केंद्रीय मंत्रिपद जुलै 2002 ते मे 2003 भूषविले
पुरस्कार संपादन
सामाजिक कार्यातील योगदानासाठी त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्कार
पहिले खाजगी तंत्रनिकेतन संपादन
त्यांनी राज्यातील पहिले खाजगी तंत्रनिकेतन 1980 मध्ये प्रवरानगर येथे सुरू करून ग्रामीण शिक्षणाची चळवळ सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली. पंचायत समिती, जिल्हा परिषद हे टप्पे पार करत बाळासाहेब काँग्रेस पक्षातर्फे 1971 मध्ये कोपरगाव मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1977, 1980, 1984 आणि 19 89 अशा सलग चार निवडणुका विखे यांनी या मतदारसंघातून जिंकल्या. 1989 मध्ये बोफोर्स आणि राम जन्मभूमी मुद्द्यावरून काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेब विखे यांनी पक्षाच्या पराभवाची चर्चा पक्षांतर्गत व्यासपीठावर व्हावी यासाठी एका फोरमची स्थापना केली. पक्षात अधिक लोकशाही यावी हा या फोरम स्थापण्यामागचा उद्देश आहे असे बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते.
संदर्भ संपादन
https://www.loksatta.com/vishesh-news/tribute-to-balasaheb-vikhe-patil-1374541/