बिजू पटनायक विमानतळ
साचा:विस्तार साचा:Infobox Airport
बिजू पटनायक विमानतळ साचा:विमानतळ संकेत, हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा संपादन
ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. [१]. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली साचा:Convert इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे.
या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात.
भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी)
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
- बिजू पटनायक विमानतळसाचा:मृत दुवा (भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर))
- साचा:WAD