Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
भुजरिया - मराठीपिडिया

भुजरिया हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील साजरा होणारा सण आहे.[] राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेला, मध्य प्रदेशातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो.[]तृतीयपंथी समुदायातील सदस्य यात विशेषत्वाने सहभाग घेतात.[] हा किन्नरांचा विशेष उत्सव मानला जातो.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

स्वरूप संपादन

गव्हाच्या कोवळ्या रोपांना भुजलिया किंवा कजलिया म्हणतात. काही पंचांगांत या सणाचे नाव कजलिया पर्व असे दिलेले आढळते.[] बुंदेलखंड येथे याचे विशेष महत्त्व आहे.[] या सणादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक व्यक्ती भुजलियांची देवाणघेवाण करताना दिसतात. देशात समृद्धी आणि शांती रहावी अशी कामना या दिवशी केली जाते. गावातील लोकांमधील जातिभेद दूर होऊन सद्‌भाव नांदावा यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. भुजरिया पर्वाच्या दिवशी विविध संस्था भुजरिया संमेलन भरवतात. भुजरिया सणाच्या निमित्ताने घरात राखून ठेवलेल्या गव्हाच्या बियाणांची गुणवत्ता तपासली जाते.[] या सणाच्या काही दिवस आधी, म्हणजे श्रावण शुक्ल नवमीला एका बांबूच्या आणि मोहाच्या पानांनी बनलेल्या टोपलीत माती भरून तीत कोठारात बिजाणे म्हणून जपून ठेवलेल्या गव्हाचे थोडे दाणे पेरतात. भुजरियाच्या दिवशी टोपलीत उगवलेली कोवळी रोपे उपटून ती तलावावर किंवा नंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. []नंतर गावकरी त्या रोपांची आपआपसात देवाणघेवाण करून त्यांची गुणवत्ता तपासतात. या सणाच्या दिवशी तलावांवर जत्रेचे वातावरण असते.[]

हे ही पहा संपादन

संदर्भ संपादन