राजा शिवछत्रपती (मालिका)

साचा:दूरचित्रवाणी कार्यक्रम

राजा शिवछत्रपती ही एक मराठी दुरचित्रवाहिनी मालिका आहे. हे ऐतिहासिक नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. राजा शिवछत्रपती ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर २००८-०९ मध्ये प्रसारित झाली. २०२० लॉकडाऊन दरम्यान प्रेक्षकांच्या मागणी मुळे राजा शिवछत्रपती मालिकेचे पुनःप्रसारण केले जात होते.[].

निर्मिती संपादन

राजा शिवछत्रपती निर्मिती आणि चित्रीकरण 'एन. डी. स्टुडिओ' मध्ये झाले. हे स्टुडिओ कर्जत येथे आहे. हे नाटक हिंदी चित्रपट सृष्टीतील आर्ट डायरेक्टर नितिन चंद्रकांत देसाई यांनी केले. राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरेंच्या याच नावाच्या कादंबरी वरून बनवले गेले होते. नवखे कलाकार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आणि मृणाल कुलकर्णी यांनी राजमाता जिजाबाईंची भूमिका निभावली.या कार्यक्रमाचं वेशभूषा व्यवस्थापन पूर्णिमा ओक यांनी केलं तर कार्तिक केंढे यानी सह दिग्दर्शक केल. प्रतीआभास दृश्यांची निर्मिती जितेंद्र वर्मा यानी केली. रंगभूषा अमोद दोषी आणी सुहास गवते यानी केली. ध्वनि कार्य विजय भोपे यांनी सांभाळले. राजा शिवछत्रपती कार्यक्रमातील वेशभुषा निता लुल्ला यानी बनवली होती. सर्व देखावे नितीन चंद्रकांत देसाई यानी बनवले होते. या कार्यक्रमाचं वेशभूषा व्यवस्थापन पूर्णिमा ओक यांनी केलं तर कार्तिक केंढे यानी सह दिग्दर्शक केल. प्रतीआभास दृश्यांची निर्मिती जितेंद्र वर्मा यानी केली. रंगभूषा अमोद दोषी आणी सुहास गवते यानी केली. ध्वनि कार्य विजय भोपे यांनी सांभाळले. राजा शिवछत्रपती कार्यक्रमातील वेशभुषा निता लुल्ला यानी बनवली होती. सर्व देखावे नितीन चंद्रकांत देसाई यानी बनवले होते. []

कलाकार संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी