आईसाहेब महंत राधाताई महाराज सानप या महाराष्ट्रातील एकमेव महिला मठाधिपति आहेत. संत मीराबाई [आईसाहेब ] संस्थान तीर्थक्षेत्र हे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र असून महिलांची पंढरी म्हणून ओळखले जाते. राधाबाईंचा हा मठ महासांगवी (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे.

आईसाहेब राधाताई महाराज सानप या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील पाटोडा तालुक्यात असलेल्या १६०० एवढी लोकसंख्या असलेल्या महासांगवी या गावात राहणाऱ्या महंत आहेत. त्या अत्यंत अभ्यासू कीर्तनकार असून त्यांनी सांप्रदायिक कीर्तने, स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबंदी व शैक्षणिक, सामाजिक व इतर विषयांवर प्रबोधन करून समाज जागृतीची कामे करतात. त्यांच्या कीर्तनांतून त्या स्त्रीभ्रूण हत्याविरोधी प्रचार करतात.

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन