लेक्युन सेक्या बुद्ध
लायक्युन सेक्य बुद्ध (बर्मीज: လေး ကျွန်း စင်္ ကြာ; इंग्रजी: Laykyun Sekkya Buddha) हा म्यानमारमधील एकूण ४२४ फूट (१२९ मीटर) उंच असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच पुतळा आहे. हा बुद्ध पुतळा एकतीस मजल्यांचा आहे, ज्यामध्ये बौद्ध साहित्याप्रमाणे ३१ जीवनशैलींची ३१ रेषाकृती आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक मजल्यातील भिंतीवरील चित्रे अतिशय मनोरंजक आणि लोकप्रिय आहेत. हा पुतळा पायथ्यापासून वर ३८१ फूट (११६ मीटर) उंच असून पायथ्याची (आसन) उंची ४४ फूट (१३.५ मीटर) आहे. गौतम बुद्धांचा हा पुतळा म्यानमार देशातील मोण्वाजवळील खटाकन तैंग या गावात स्थित आहे. याचे बांधकाम १९९६ पासून सुरू झाले व २१ फेब्रुवारी २००८ रोजी पुतळा पूर्ण करण्यात आला. हे चीफ अब्बोट वेन. नारडा यांनी सुरू केले. चीनमधील स्प्रिंग टेंपल बुद्ध नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बुद्ध पुतळा आहे. पुतळ्याचे बांधकाम २००८ मध्ये पूर्ण झाले.
चित्रदालन संपादन
-
Laykyun Sekkya and Sleeping Buddha
-
Approaching Bodhi Tataung
-
Laykyun Sekkya Monywa
-
Laykyun Setkyar Buddha Statue Monywa, Myanmar
-
Laykyun Setkyar Muni
-
The 423 ft standing Buddha at Bodhi Tataung