साचा:माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.साचा:संदर्भ मुंबई मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे.

निवडणूक चिन्ह संपादन

"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.

शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष संपादन

  • १९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.
  • १९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट
  • १९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट)
  • १९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती)
  • १९७४ : काँग्रेस
  • १९७७ : दलित पँथर (काही काळापुरती)
  • १९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली.
  • १९९० ते २०१९ : भाजप
  • २००७ आणि २०१२ : काँग्रेस
  • २००८ :राष्ट्रवादी काँग्रेस
  • २०१९ ते सद्य (२०२१) : काँग्रेस

संदर्भ व नोंदी संपादन

संदर्भ पुस्तके
  • २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
  • ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
  • ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
  • ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)
  • ६. दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया (इंग्रजी पुस्तक, लेखिका तारिणी बेदी)
  • ७. सॅफ्रन टाईड (इंग्रजी पुस्तक, लेखक किंगशुक नाग)
  • ८. सम्राट (इंग्रजी पुस्तक, लेखिका सुजाता आनंदन)
  • ९. बाळ ठाकरे (इंग्रजी पुस्तक, लेखक वैभव पुरंदरे)
  • १०. बॉम्बे मेरी जान (इंग्रजी पुस्तक, लेखक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस)
  • ११. महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष (लेखक - सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी)
  • १२. सुवर्ण महोत्सवी सेना (लेखक - विजय सामंत आणि हर्षल प्रधान)

साचा:विस्तार साचा:भारतीय राजकीय पक्ष