सायरस पालनजी मिस्त्री
साचा:माहितीचौकट व्यक्ती सायरस पालनजी मिस्त्री ( ४ जुलै, इ.स. १९६८) हे १८८७ साली स्थापन झालेल्या ' टाटा सन्स ' ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. ते २०१२ ते ऑक्टोबर २०१६दरम्यान या पदावर होते. टाटा सन्सचे १८ टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे.
रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी घेतलेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालकम्हणून दाखल झाले. सायरस यांचे त्यांचे वडील पालनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे.