सौरभ गांगुली
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
सौरभ चंडीदास गांगुली (बांगला:সৌরভ গাঙ্গুলী) (जुलै ८, इ.स. १९७२ - )[१] भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
गांगुली डावखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे.[२] त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत.[३] गांगुली भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे[४] याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत.[५] गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,०००धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.[६]
गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला.[७] याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता.[८]
संदर्भ व नोंदी संपादन
साचा:१०००० धावा एकदिवसीय सामने साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:सहारा पुणे वॉरियर्स सद्य संघ