Jump to content

कण्व घराणे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कण्व घराणे (इ.स.पू. ७३ ते इ.स.पू. २८) याची स्थापना वसुदेव याने इ.स.पू. ७३ मध्ये केली होती.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभूती हा केवळ नावाचा राजा होता. सर्व कारभार त्याचा मुख्य प्रधान वसुदेव याच्याच हातात होता. या वसुदेवानेच देवभूतीला ठार करून मगधाचे राज्य बळकावले व तेथून पुढे मगधावरील शुंगांची सत्ता जाऊन तेथे कण्व घराण्याची सत्ता चालू झाली.

राजे[संपादन | स्रोत संपादित करा]

वसुदेव धरून कण्व घराण्यात एकूण चार राजे झाले. १. वासुदेव २. भुमीमित्र ३. नारायण ४. सुसामन (सुशर्मा)

कामगिरी[संपादन | स्रोत संपादित करा]

या चारही राजांनी मिळून फक्त पंचेचाळीस वर्षे राज्य केले.

शेवट[संपादन | स्रोत संपादित करा]

इ.स.पू. २८ मध्ये या घराण्यातील शेवटचा राजा सुशर्मा याला सातवाहन घराण्यातील एका राजाने ठार मारून मगधावर आपली सत्ता प्रस्थापित करून कण्व घराण्याचा शेवट केला.

साचा:भारतीय राजवंश