Jump to content

यशवंतराव थोरात

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट राज्याधिकारी यशवंतराव थोरात (१६८८=१७१९) हे कोल्हापूरकर छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचे सेनाखासखेल आणि प्रमुख आधारस्तंभापैकी एक होते. छत्रपती संभाजींनी त्यांच्या शौर्यासाठी त्यांना 'सेनाखासखेल' हे पद बहाल केले. यशवंतराव थोरात हे वारणा खो-यातले एक पिढीजात वतनदार होते. छत्रपती संभाजींनी त्यांना विजापूर प्रांतात जहागीर दिली होती. त्यांनी आष्टा या ठाण्याला आपल्या कामकाजाचे मुख्यालय बनवले. १७१७-१७१९सालच्या दरम्यान त्यांनी विजापूर प्रांत आपल्या अधिकाराखाली आणला. जून १७१९मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवा यांच्या विरुद्ध लढताना‌ पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झालेल्या लढाईत त्यांना वीरमरण आले. इतिहासात ती लढाई 'आप्टीची लढाई' म्हणून ओळखली जाते.

सुरुवातीचा काळ[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]