Jump to content

अबुल फैजी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१०, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत अबुल फैजी (२४ सप्टेंबर, इ.स. १५४७ - ५ ऑक्टोबर, इ.स. १५९५[]) हा सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. अकबराच्या दरबारात राजकवी म्हणूनही त्याने काम केले. याच्या वडिलाचे नाव शेख मुबारक असे होते. अकबराने अबुलला दरबाराच्या वतीने शिक्षक म्हणून नेमणूक दिली. अकबराने बुरहानपूर येथे दरबाराचा वकील म्हणूनही त्याची नेमणूक केली होती. कविराज या अर्थाचा मलिक-उश-शुअरा हा किताब त्याला देण्यात आला होता.

लेखन[संपादन | स्रोत संपादित करा]

अबुल फैजीने सम्राटाच्या आग्रहावरून नल-दमयंती आख्यानावर फारसीत महाकाव्य रचले. महाभारताचा फारसी अनुवादही केला. भास्कराचार्याच्या बीजगणित व लीलावती या ग्रंथांची फारसीत भाषांतरे केली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी