इंदूर संस्थान
इंदूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील सेन्ट्रल इंडिया एजन्सी मधील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाला होळकर संस्थान असेही म्हणत. या संस्थानाचे संस्थानिक होळकर घराणे होते.
क्षेत्रफळ संपादन
इंदूर संस्थानाचे क्षेत्रफळ २४,६०५ चौरस किमी इतके होते. या संस्थानात सुमारे ३,३६८ गावे होती.
राजधानी संपादन
या संस्थानाची राजधानी इंदूर या नगरात होती.
स्थापना संपादन
इंदूर संस्थानाची स्थापना सन १७३३ या वर्षी मल्हारराव होळकर यांनी केली.
स्वातंत्र्योत्तर काळ संपादन
इंदूर संस्थानाचे महाराजा यशवंतराव(द्वितीय) यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर १ जानेवारी १९५० या दिवशी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.