Jump to content

पुणे सार्वजनिक सभा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिकरण

चित्र:Poona Sarvajanik Sabha.jpg
पुणे सार्वजनिक सभेचे मसिक- अंक ३

पुणे सार्वजनिक सभा - सरकार आणि प्रजा यांच्यातील प्रश्न पत्रव्यवहार, वाटाघाटी इत्यादी मार्गांनी सोडविण्यासाठी एखादी औपचारिक सार्वजनिक सभा स्थापन करणे या हेतूने प्रस्तुत सभेचे आयोजन २ एप्रिल १८७० रोजी करण्यात आले होते.[] पुण्यातील ९५ प्रतिष्ठित नागरिक या सभेचे सभासद झाले. प्रत्येक सभासद हा ५० लोकांचा प्रतिनिधी होता. सभेचा हेतू विशद केल्यानंतर 'पुणे सार्वजनिक सभा' ही संस्था स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. या पहिल्या सभेत सभेचे जे अधिकार मंडळ नेमण्यात आले ते पुढीलप्रमाणे होते.

अध्यक्ष: श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी (औंध संस्थान)

उपाध्यक्ष: श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंतसचिव (भोर), श्रीमंत रामचंद्र अप्पासाहेब जमखिंडीकर, श्री. निळकंठ माधवराव पुरंदरे, श्रीमंत धुंडीराज चिंतामण पटवर्धन सांगलीकर, श्रीमंत विनायक अप्पासाहेब कुरुंदवाडकर, श्रीमंत माधवराव बल्लाळ फडणीस मेणवलीकर

पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्षपद भूषविलेल्या मान्यवरांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, ल. ब. भोपटकर, कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, दा. वि. गोखले, विष्णू मोरेश्वर भिडे, गणपतराव नलावडे, र. बा. फडके, पोपटलाल शहा, ॲड. पुरुषोत्तम डावरे, पुरुषोत्तम गणेश मोडक, अरिवद आळेकर ह्यांचा समावेश आहे.[]

१८९० मध्ये गोपाळ कृष्ण गोखले हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी २. पुणे सार्वजनिक सभा MPSC PDF Notes

संदर्भ सूची[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सार्वजनिक काका - म.श्री.दीक्षित
  • वासुकाका व त्यांचा काल - त्र्यं. देवगिरीकर