बाबू गेनू सैद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बाबू गेनू सैद (इ.स. १९०९; महाळुंगे पडवळ - डिसेंबर १२, इ.स. १९३०, मुंबई) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला एक स्वातंत्र्यसैनिक होता. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकाला रोखण्यासाठी तो रस्त्यावर आडवा पडला. १२ डिसेंबर १९३०ला अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत यात्रेस २० हजाराचा जमाव होता. सोनापूर (मुंबई) स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाह्य दुवे संपादन

साचा:विस्तार