फराहबक्ष महाल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:४२, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

फराहबक्ष महाल हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे असलेला महाल आहे. चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी ही अष्टकोनी वास्तू आहे. अहमदनगरच्या निजामशाहीतील राजा मुर्तझा निजामशाह याने या महालाचे बांधकाम इ.स. १५७६ ते इ.स. १५८३ या काळात करवून घेतले. घुमट, उंच कमानी व मोठी गवाक्षे असलेल्या महालाच्या मध्यभागी रंगमहाल आहे. मध्यभागी तसेच चारही बाजूला कारंजी असून त्यासाठी त्याकाळी खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
फराहबक्ष महाल, अहमदनगर

राष्ट्रीय संरक्षित स्मारक संपादन

भारत सरकारने फराहबक्ष महालाला दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी