Jump to content

लोहस्तंभ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट स्मारक दिल्ली येथील मेहरौली उपनगरात एक लोहस्तंभ आहे. हा एक २३ फूट ८ इंच (७.२ मीटर) उंच आणि १६ इंच व्यासाची दंडगोलाकार खांब असून त्याची निर्मिती "राजा चंद्र", बहुदा दुसरा चंद्रगुप्त (इ.स. ३७५-४१५) याने केली.[][] हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. स्तंभाचे वजन साचा:Convertपेक्षा जास्त असून असे मानले जाते की याची निर्मिती कदाचित उदागिरी लेण्यांच्या बाहेर केली गेलीसाचा:Sfn आणि, दिल्ली सल्तनतच्या सुरुवातीला ते सध्याच्या ठिकाणी उभे केले गेले..

भौतिक वर्णन[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कुव्वत-उल-इस्लाम मशिदीच्या आवारातील लोहस्तंभ

स्तंभाची उंची, त्याच्या शिखरापासून पायापर्यंत, साचा:Convert इतकी असून पायाचा साचा:Convert भाग जमिनीखाली आहे. त्याच्या शिखराच्या भागाची उंची साचा:Convert इतकी आहे. खांबाचे वजन साचा:Convert पेक्षा जास्त आहे. []. खांबाच्या गंजप्रतिरोधक क्षमतेमुळे त्याने पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि पदार्थविज्ञान शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्या खांबाला "पुरातन भारतीय कारागिरांच्या लोह काढणे आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या उच्च कौशल्याची साक्ष" म्हणून ओळखले जाते. [][]
फॉस्फरसमुळे लोहस्तंभावर असणाऱ्या हलक्याशा गंजाच्या आवरणातील अस्थिर ऑक्सिहायड्रॉक्साईडचे रूपांतर स्थिर ऑक्सिहायड्रॉक्साईइडमध्ये होते आणि गंजण्याची प्रक्रिया मंदावते. अधिक कालावधीनंतर यापेक्षा जास्त स्थिर असे लोखंडाचे संयुग मॅग्नेटाइट तयार होते. लोखंडामधील फॉस्फरसचा हवेतील बाष्पाशी संपर्क येऊन फॉस्फॅरिक आम्ल तयार होते. फॉस्फॅरिक आम्लाची लोखंडावर अभिक्रिया होऊन आयर्न-हायड्रोजन-फॉस्फेट- हायड्रेटचे गंजप्रतिबंधक आवरण तयार होते. हे आवरण अस्फटिकी स्वरूपात असते. लोहस्तंभाचे वजन सहा टन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे सांद्रीकरण आणि निर्जलीभवन या चक्रास चालना मिळते. यामुळे अस्फटिकी आयर्न हायड्रोजन फॉस्फेट हायड्रेटचे रूपांतर स्फटिकी स्वरूपात होते. या स्फटिकांमुळे गंजाच्या आवरणातील छिद्रे आणि भेगा भरून निघतात आणि गंजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. [] []

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. फिनबर बेरी फ्लड, २००३, "Pillar, palimpsets, and princely practices", Res, Xliii, न्यूयॉर्क विद्यापीठ, pp97.
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. साचा:स्रोत पुस्तक
  4. ४.० ४.१ ऑन द करोजन रेजिस्टन्स ऑफ द दिल्ली आयर्न पिलर, आर. बालसुब्रमण्यम, करोजन सायन्स, भाग ४२ (२०००) पान. २१०३-२१२९. करोजन सायन्स हे गंज विज्ञान आणि अभियांत्रिकी विशेष पुस्तक आहे.
  5. साचा:स्रोत पुस्तक
  6. साचा:स्रोत पुस्तक