सिंधुदुर्ग विमानतळ
Appearance
साचा:Infobox Airport सिंधुदुर्ग विमानतळ किंवा चिपी विमानतळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण समुद्र किनाऱ्यावरील मालवण आणि वेंगुर्ला या शहरांदरम्यान, चिपी-परुळे गावानजीकचे विमानतळ आहे. हे विमानतळ परुळे गावातील 'चिपी वाडी'मध्ये उभारले आहे. हे विमानतळ मुंबई -गोवा महामार्गापासून २७ किलोमीटर, आणि मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. २०१८ च्या उत्तरार्धात या विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले [१] आणि ५ मार्च२०१९ रोजी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन झाले. [२] ९ ऑक्टोबर २०२१ रोजी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली [३]
या विमानतळावर २,५०० मीटर लांबीचा रनवे असून त्यावर रुंदीने कमी असलेली एअरबस ए३२० आणि बोईंग ७३७ सारखी विमाने उतरू शकतात. विमानतळाची इमारत सुमारे ४०० विमान प्रवाशांची सोय करू शकते.