माधव गुडी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट गायक पंडित माधव गुडी ( : धारवाड, कर्नाटक, इ.स. १९४१; - हुबळी, कर्नाटक, २२ एप्रिल इ.स. २०११) हे हिंदुस्तानी संगीत शैलीतील गायक होते.

जीवन संपादन

माधव गुडी यांचा जन्म वर्तमान कर्नाटकातील धारवाड येथे इ.स. १९४१ साली कीर्तनाची परंपरा असलेल्या घराण्यात झाला. अगदी लहानपणीच ते बसवराज राजगुरू यांच्याकडे गायन शिकू लागले. त्यांच्या आवाजाचा आवाका लक्षात घेऊन राजगुरू यांनीच त्यांना भीमसेन जोशी यांच्याकडे सुपूर्द केले आणि तब्बल पंचवीस वर्षे गुडी यांनी भीमसेन जोश्यांकडे किराणा घराण्याची तालीम घेतली.

आयुष्याच्या अखेरची काही वर्षे गुडी यकृताच्या आजाराने आजारी होते. एप्रिल २२ इ.स. २०११ रोजी कर्नाटकातील हुबळी येथे त्यांचे निधन झाले.

साचा:संगीतातील अपूर्ण लेख साचा:हिंदुस्तानी संगीत