कोहिनूर (चित्रपट)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट

कोहिनूर हा १९६०चा बॉलीवूड चित्रपट आहे. व्ही. एन. सिन्हा त्याचे निर्माते आहेत आणि एस. यू. सनी यांनी त्याला दिग्दर्शित केले आहे. दिलीप कुमार, मीना कुमारी, लीला चिटणीस आणि कुमकुम यांनी या चित्रपटाची अभिनय केला आहे.चित्रपटाचे फिल्मचा संगीत नौशाद यांचे आहे.

असे म्हणतात की देवदास सारख्या चित्रपटांत दुःखद भूमिका साकारल्याने दिलीप कुमार हे अत्यंत निराशावस्थेत गेले आणि त्यांच्या मनोचिकित्सकांने त्यांना विनाताण हसतखेळत व हलक्याफुलक्या भूमिका साकारण्याची शिफारस केली. कोहिनूर चित्रपटातील त्यांची भूमिका ही अशीच होती. कोहिनूरमध्ये दिलीप कुमार आणि मीना कुमारी यांना वेगवेगळ्या राज्यांचे राजकुमार व राजकुमारी म्हणून दर्शविण्यात आले आहे.त्यात तलवारयुद्ध , गाणे आणि नृत्य यासारख्या गोष्टी भरपूर आहेत. या चित्रपटात मीना कुमारी, ज्यांना अन्यथा 'दुःखाची राणी' म्हणून ओळखले जाते,यांनी काही दुर्मिळ विचित्र आणि मजेदार दृश्येदेखील रंगविलेली आहेत. तो चित्रपट हलका-फुलका होता आणि त्याच्या पूर्वीच्या चित्रपटांसारखे पात्रांचे उदात्तीकरण त्यात नव्हते. हा चित्रपट त्या वर्षातील एक मोठा यशस्वी ठरलेला चित्रपट होता.