Jump to content

क्रिश (हिंदी चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट

क्रिश हा चित्रपट बॉलीवूडच्या कोई... मिल गया या सुपरहीट चित्रपटाचा उत्तर-कृति आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. कोई मिल गया प्रमाणेच क्रिश चित्रपट ही एक वि‍ज्ञान परिकल्पना आहे. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी १७ कोटी रूपये खर्च झाले. तसेच या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी राकेश रोशन यांनी १२ कोटी रूपये खर्च केले.

कथानक[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:गौप्यस्फोट इशारा एका परग्रहवासियाकडून रोहित मेहराला (ॠतिक रोशन) मिळालेली अनैसर्गिक शक्ती कृष्णा मेहरा या त्याच्या मुलाकडेही येते. या शक्तीमुळे त्याला जलद गती व ताकद मिळते. चित्रपटातील त्याची प्रेयसी प्रिया (प्रियांका चोप्रा) त्याला सिंगापूरला घेऊन जाते. तिथे तो विकृत वैज्ञानिक डॉ. सिद्धांत आर्या (नसीरुद्दीन शाह) पासून जगाला वाचवितो.