Jump to content

अबेय कुरूविला

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अबेय कुरूविला किंवा आबे कुरुविला (८ ऑगस्ट १९६८) हा १९९० च्या दशकाच्या मध्यातला एक माजी भारतीय वेगवान गोलंदाज आहे, जो त्याच्या ६ फूट ५ इंच (१.९६ मीटर) उंची आणि चांगल्या आंगकाठीसाठी प्रसिद्ध आहे.

तो चेंबूर,या मुंबईच्या उपनगरात वाढला. २००० मध्ये त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कोचिंग घेणे सुरू केले. कुरुविला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कुरुविला हे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय वरिष्ठ निवड समितीचे सदस्य होते. तसेच ते पश्चिम विभागातील निवड समितीचे सदस्य होते. कुरुविलाच्या अचानक राजीनाम्याचे कारण ठरला तो बीसीसीआयचा नवीन नियम. या नियमानुसार, कोणताही निवडकर्ता ५ वर्षांपेक्षा जास्त काळ निवड समितीचा सदस्य राहू शकत नाही. आबे कुरुविला डिसेंबर २०२० मध्ये वरिष्ठ निवड समितीचे सदस्य झाले, पण त्यापूर्वी ते चार वर्षे कनिष्ठ निवड समितीचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना आपले पद सोडावे लागले होते. कुरुविला यांनी पायउतार झाल्यानंतर वरिष्ठ निवड समितीमध्ये ४ सदस्य उरले आहेत.

२ मार्च २०२२ला अभय कुरुविलाला बीसीसीआयचे नवे सरव्यवस्थापक बनवण्यात आले आहे. बोर्डाचे माजी सरव्यवस्थापक धीरज मल्होत्रा ​​यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.


साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती