राजू कुलकर्णी
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
राजीव रमेश कुलकर्णी (सप्टेंबर २५,इ.स. १९६२:मुंबई - ) हा भारताकडून एकदिवसीय व कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.
कुलकर्णीने ऑक्टोबर इ.स. १९८६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याशिवाय तो पाकिस्तानविरुद्ध दोन कसोट्या खेळलेला आहे. इ.स. १९८७मध्ये तो पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यातही खेळला. कुलकर्णी एकूण दहा एकदिवसीय सामने खेळला आहे. १९९० च्या एशिया कप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती, परंतु तेथे एकही सामना न खेळता त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली.
इ.स. १९९२मध्ये कुलकर्णीने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व आता तो खेळसाहित्य विक्रीच्या व्यवसायात आहे.