Jump to content

रमण लांबा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:२३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रमण लांबा (जन्म : उत्तर प्रदेश, भारत, जानेवारी २, इ.स. १९६०; - ढाका, बांग्लादेश, फेब्रुवारी २३, इ.स. १९९८) हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले खेळाडू होते. ते उजव्या हाताने फलंदाजी करत असत. भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून ते ४ कसोटी, तसेच ३२ एकदिवसीय सामने खेळले. ढाका क्लबस्तरीय क्रिकेट सामन्यात शॉर्ट लेग क्षेत्ररक्षकाच्या जागेवरून शिरस्त्राणाविना क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून त्यांचा मृत्यू झाला.


पहा : फिलिप ह्यूज; सयाजीराव धनवडे

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू