Jump to content

२०१६-१७ रणजी करंडक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket tournament २०१६-१७ रणजी करंडक ही भारतातील एक मुख्य प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेची ८३ आवृत्ती होती. मागील हंगामांपेक्षा वेगळ्या पद्धतीने २०१६-१७ची स्पर्धा ही तटस्थ ठिकाणांवर खेळवली गेली.[][][] कर्णधार आणि प्रशिक्षकांनी ह्या बदलास पाठिंबा दिला.[] सदर स्पर्धेत पदार्पण करणारा छत्तीसगड क्रिकेट संघ हा रणजी करंडक स्पर्धेत भाग घेणारा २८वा संघ होता.[][] मुंबईचा संघ हा गतविजेता होता.[] अंतिम सामन्यात गुजरातने मुंबईला ५ गडी राखून पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.[]

सप्टेंबर २०१६ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेच्या तारखा, गट आणि वेळापत्रक जाहीर केले.[] दिवस/रात्र कसोटी क्रिकेट खेळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यास मदत व्हावी ह्या हेतूने स्पर्धेत यावेळी गुलाबी चेंडू वापरण्यात आला.[१०]

ऑक्टोबर २०१६ मध्ये, गट बच्या महाराष्ट्र आणि दिल्ली दरम्यानच्या सामन्यात, महाराष्ट्रातर्फे खेळताना स्वप्निल गुगले आणि अंकित बावने यांनी रणजी स्पर्धेत ५९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. प्रथम-श्रेणी क्रिकेट मधील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी होती.[११]

गट अ मधील गुजरात विरुद्ध बंगाल आणि गट क मधील हैदराबाद विरुद्ध त्रिपुरा हे सामने धुरक्यामुळे रद्द करण्यात आले.[१२] बीसीसीआयने सुरुवातीला, गट फेरी संपल्यानंतर ह्या सामन्यांचे आयोजन केले होते.[१२] ह्या सामन्यांना तारखा उपलब्ध करून देण्यासाठी, बाद फेरीतील सामने पुढे ढकलण्यात आले होते.[१२] मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) या दोघांनी वेळापत्रकात बदल करण्यास विरोध केला.[१३] एमसीएचे सह-सचिव उन्मेश खानविलकर म्हणाले की "ह्यामुळे बाद फेरीसाठी पात्र होण्यास सहभागी संघांना अयोग्य असा फायदा मिळेल".[१३] टीएनसीएचे सचिव कासी विश्वनाथन, ह्यांनी म्हटले "सामन्यांच्या तारखा बदलू नयेत आणि गुण विभागून देण्यात यावेत ".[१३] ह्या नंतर बीसीसीआयने सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला.[१४] डिसेंबर २०१६ मध्ये, बदलांचा निर्णय रद्द करण्यात आला आणि रद्द झालेल्या सामन्यांसाठी प्रत्येक संघाला प्रत्येकी १ गुण देण्यात आला.[१५]

अ गटातून मुंबई, गुजरात आणि तमिळनाडू, ब गटातून झारखंड, कर्नाटक आणि ओरिसा आणि क गटातून हैदराबाद आणि हरयाणा हे संघ स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र होऊ शकले[१६][१७][१८][१९] उपांत्यपूर्व फेरीच्या तारखा एका दिवसाने आणि उपांत्य सामन्यांच्या तारखा दोन दिवसाने मागे गेल्या.[२०] इंदूरमधील होळकर मैदानावर अंतिम सामना आधी ठरल्यापेक्षा दोन दिवस अगोदार १० जानेवारी २०१६ रोजी खेळवण्यात आला.[२०]

उपांत्य सामन्यात गुजरातने झारखंडला १२३ धावांनी पराभूत करून रणजी करंडक इतिहासात १९५०-५१ नंतर दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला.[२१] दुसरीकडे मुंबईने तमिळनाडूला ६ गडी राखून पराभूत करून ४६व्यांदा रणजी करंडक अंतिम सामन्यात धडक मारली.[२२]

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

संघ खालील प्रमाणे तीन गटांमध्ये विभागले गेले:[]

साचा:Col-begin साचा:Col-3 गट अ

साचा:Col-3 गट ब

साचा:Col-3 गट क

साचा:Col-end

गुणफलक[संपादन | स्रोत संपादित करा]

गट अ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:रणजी करंडक, २०१६-१७ अ-गट गुणफलक

गट ब[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:रणजी करंडक, २०१६-१७ ब-गट गुणफलक

गट क[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:रणजी करंडक, २०१६-१७ क-गट गुणफलक

निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

गट अ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:रणजी करंडक, २०१६-१७ अ-गट सामने

गट ब[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:रणजी करंडक, २०१६-१७ ब-गट सामने

गट क[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:रणजी करंडक, २०१६-१७ क-गट सामने

बाद फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:8TeamBracket

उपांत्यपूर्व सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने


साचा:माहितीचौकट कसोटी सामने


साचा:माहितीचौकट कसोटी सामने


साचा:माहितीचौकट कसोटी सामने


उपांत्य सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने


साचा:माहितीचौकट कसोटी सामने


अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]