Jump to content

रवी कुमार दहिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रवी कुमार दहिया (१२ डिसेंबर १९९७) हा भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे ज्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकले.[][][] तो रवी कुमार म्हणूनही ओळखला जातो. तो हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. दहिया हा 2019च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता आहे, तसेच त्याने दोन वेळा आशियाई चॅम्पियन स्पर्धा देखील जिंकली.[]

भारत सरकारने 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान देऊन रवीचा गौरव केला.[]

वैयक्तिक पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव करून रवी कुमारने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.[] अंतिम फेरीमध्ये रशियाच्या झागुर युगूएव्हकडून पराभूत झाल्यावर रवी कुमारला रौप्यपदक मिळाले.[] टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा मीराबाई चानूनंतर रौप्यपदक मिळवणारा रवी कुमार हा दुसरा भारतीय ठरला.

तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती या खेळात पदक मिळवणारा खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिकनंतर पाचवा भारतीय कुस्तीपटू ठरला.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • २०२१ मध्ये रवी कुमारला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.[]

साचा:संदर्भनोंदी