अविनाश डोळस

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अविनाश डोळस (जन्म :  ; - अौरंगाबाद, ११ नोव्हेंबर २०१८) हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. डोळस हे आंबेडकरी चळवळीतील एक पुढारी होते.. त्यांनी आंबेडकरी विषयांवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य व प्रकाशन समितीचे ते माजी सदस्य सचिव होते.[]

पुस्तके संपादन

  • आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने (चरित्र, सहलेखक राम दोतोंडे)
  • आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ
  • आंबेडकरी विचार आणि साहित्य
  • महासंगर (कथासंग्रह)
  • सम्यकदृष्टीतून...

सन्मान आणि पुरस्कार संपादन

  • जानेवारी १९९०मध्ये भरलेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • जानेवारी २०११मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या १२व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी